बीटस्तरीय स्पर्धेत गुळूंचवाडी शाळेचे घवघवीत यश
1 min read
बेल्हे दि.२:- यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव तर्फे आळे या ठिकाणी संपन्न झाला. या स्पर्धेत गुळूंचवाडी शाळेच्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. क्रीडा स्पर्धेत खो-खो, कबड्डी, लंगडी, आट्यापाट्या या स्पर्धेत गुळूंचवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
1. कबड्डी मोठा गट मुले- प्रथम क्रमांक 2. लंगडी मुली मोठा गट- प्रथम क्रमांक 3. लेझीम मुली मोठा गट- प्रथम क्रमांक 4. आट्यापाट्या मुली- प्रथम क्रमांक 5. खोखो मुले मोठा गट- द्वितीय क्रमांकम 6. आट्यापाट्या मुले मोठा गट- द्वितीय क्रमांक 7. कविता गायन मोठा गट- द्वितीय क्रमांक 8. प्रश्नमंजुषा मोठा गट- द्वितीय क्रमांक
9.हर्षल पवार इयत्ता सातवी, गोळा फेक- द्वितीय क्रमांक
10.सोयल जाधव इयत्ता सातवी, थाळीफेक -प्रथम क्रमांक 11. ओम मधे, 100 मिटर धावणे मोठा गट-द्वितीय क्रमांक 12. ओम मधे,उंच उडी मोठा गट -द्वितीय क्रमांक 13. ओम मधे,लांब उडी मोठा गट- प्रथम क्रमांक 14.आर्या शिंदे, इयत्ता पाचवी मोठा गट 100 मीटर धावणे मुली- प्रथम क्रमांक
15. दिव्या विलास गुंजाळ, इयत्ता सातवी, वक्तृत्व स्पर्धा मोठा गट- प्रथम क्रमांक 16. सुरेखा पांडुरंग जाधव, इयत्ता सातवी, थाळीफेक मोठा गट- प्रथम क्रमांक 17. दीपिका दीपक जाधव, इयत्ता सातवी, गोळा फेक मुली- प्रथम क्रमांक 18. क्रिष्णा संतोष गुंजाळ बुद्धिबळ मोठा गट-द्वितीय क्रमांक
19. केतन रमेश शिंदे, इयत्ता सातवी, पोवाडा गायन मोठा गट- प्रथम क्रमांक 20. केतन रमेश शिंदे, इयत्ता सातवी वैयक्तिक गायन, मोठा गट-प्रथम क्रमांक 21. पौर्णिमा लक्ष्मण कोतवाल, इयत्ता पाचवी उंच उडी मोठा गट मुली -प्रथम क्रमांक 22. पौर्णिमा लक्ष्मण कोतवाल, इयत्ता पाचवी, लांब उडी मोठा गट मुली- प्रथम क्रमांक
23. संकेत जाधव, इयत्ता चौथी, लांब उडी लहान गट- द्वितीय क्रमांक 24. रविना जाधव, इयत्ता तिसरी लहान गट उंच उडी- तृतीय क्रमांक 25. लहान गट खो-खो मुली – तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या सर्व विजयी स्पर्धक व संघाला शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी यांनी मार्गदर्शन केले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट काळे, माजी अध्यक्ष रंगनाथ भांबेरे, उपाध्यक्ष राजश्री गुंजाळ , माजी उपाध्यक्ष चंचल गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गुंजाळ, उद्योजक जालिंदर देवकर, दत्तात्रय भांबेरे, सदस्य तसेच गावचे सरपंच अतुल भांबेरे,
उपसरपंच शांताराम गुंजाळ, माजी सरपंच वैशाली गुंजाळ सामाजिक कार्यकर्ते अनिल गुंजाळ ग्रा.पं. सदस्य यांनी विजयी स्पर्धक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
