सर्व ठिकाणची मतमोजणी २१ डिसेंबरलाच? राज्य निवडणूक आयोगाची तयारी
1 min read
मुंबई दि.२:- न्यायप्रविष्ठ प्रकरणांमुळे २४ नगरपालिका आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी मंगळवारी होणारी निवडणूक लांबणीवर टाकण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून
बुधवारची मतमोजणी रोखण्याच्या न्यायालायच्या इशाऱ्यानंतर सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी एकत्रीत २१ डिसेंबरला घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगात सुरु झाल्या असून आज न्यायालयात त्यावर शिक्कमोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणूक आयोगाने शनिवारी २४ नगरपरिषदा आणि १५४ सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची घोषणा केली. आयोगाच्या या निर्णयावर सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र आक्षेप घेत मंगळवारीच मतदान घेण्याचा आग्रह धरला. ज्या ठिकाणी अखेरच्या टप्यात मतदान रद्द करण्यात आले.
तेथील उमेवारांनी थेट उच्च न्यायालयात दाद मागितली असून सोमवारी नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर खंडपीठात अनेक याचिका दाखल झाल्या.त्यावर न्यायालयात तातडीने सुनावणी झाली. यावेळी ज्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमानुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडलेली नाही.
तेथेच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून मतदानासाठी मतदानयंत्र व अन्य सामान घेऊन निवडणूक कर्मचारी रवाना झाले आहेत. त्यामुळे आता निवडणूक पुढे ढकलता येणार नाही अशी भूमिका निवडणूक आयोगाने न्यायालयात घेतली.
त्यावर एकाच प्रभाग दोन सदस्यांना मते देण्याचा मतदारांचा हक्क असताना एकाच मताचा अधिकार कसा देता अशी विचारणा करीत एकाच प्रभागात दोनवेळा मतदान घेणे चुकीचे असून उर्वरित ठिकाणी मतदान होईपर्यंत सर्व मतमोजणी रोखण्याचा इशारा न्यायालयाने दिला होता. त्यानुसार सर्व मतमोजणी २१ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती आयोगातील सूत्रांनी दिली.
