युवतीच्या पोटात साडेतीन किलोची गाठ; डॉ. धांडे यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

1 min read

आळेफाटा दि.१:- धांडे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आळेफाटा (ता.जुन्नर) येथे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र धांडे यांना १७ वर्षाच्या युवतीच्या पोटात साडेतीन किलोची अर्धवट फुटलेली गाठ काढण्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की शनिवार दि.२७ रोजी सतत पोटात दुखणे, पोट फुगणे अशा समस्यांनी ग्रस्त असलेली भोरवाडी (ता.जुन्नर) येथील युवती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली.सदर युवतीची सोनोग्राफी केली असता तिच्या पोटामध्ये गाठ असल्याचं निदर्शनास आलं.डॉक्टरांनी नातेवाईकांना ऍडमिट करून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. शनिवार दिनांक २८ रोजी युवतीच अत्याधुनिक पद्धतीने दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करण्यात आलं. पोटामध्ये अर्धवट फुटलेली गाठ होती व बाजूला रक्तस्त्रावही झाला होता. ऑपरेशन यशस्वीरित्या झाले असून युवतीचे अंडाशय वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यामुळे भविष्यात ती युवती गर्भधारणा ही करू शकते. सदर युवतीची गाठ काढण्याची अवघड शस्त्रक्रिया डॉक्टर राजेंद्र धांडे यांनी अवघ्या काही वेळात पूर्ण केली. ऑपरेशन नंतर काही तासांतच युवती उठून व्यवस्थित चालायला लागली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी युवतीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पोटातील गाठीला पुढील तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.रुग्णाला अशक्य वाटणारी शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वी केल्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांनी व रुग्णाने डॉक्टर धांडे यांचे हृदयस्पर्शी आभार मानले. डॉ. राजेंद्र धांडे हे प्रचंड अनुभवी प्रसिद्ध स्त्री रोग व प्रसूती तज्ञ असून काही वेळातच पेशंटचा त्रास कमी करून अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण करतात.त्यांनी आजपर्यंत हजारो शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. यामध्ये अवघड प्रसूती, लॅप्रोस्कोपी, अत्याधुनिक दुर्बिणीतून पोटाच्या गाठीच्या शस्त्रक्रिया,अंडाशय व गर्भाशयाच्या गाठीच्या शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे कॅन्सर व छातीतील गाठीचे ऑपरेशन, व्यंधत्व चिकित्सा,अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल, थायरॉईडचे ऑपरेशन, अशांचा समावेश आहे. त्यामुळे अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया साठी राज्यभरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!