श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न ; ३४ वर्षानंतर वर्ग मित्र-मैत्रिणी एकत्र
1 min read
नेवासे दि.१:- पुन्हा एकदा तेच महाविद्यालय, तेच वर्ग, तेच प्राचार्य व प्राध्यापक आणि तेच मित्र-मैत्रीण अशा भावनात्मक आणि उत्साही वातावरणात नेवासे येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या १९९३-९४ च्या बॅचमधील माजी विद्यार्थी तब्बल ३४ वर्षांनी पुन्हा एकत्र आले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून या माजी विद्यार्थ्यांनी ‘गेट टुगेदर १९९३-९४ बॅच’ चे आयोजन करत महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाची सुरुवात सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पसायदान सादर करून केली. त्यानंतर सर्वजण आपल्या जुन्या वर्गात गेले, जिथे सेवानिवृत्त शिक्षकांनी प्रतीकात्मक हजेरी घेतली.
त्याक्षणी सर्वाच्या चेहऱ्यावर महाविद्यालयीन जीवनाचा आनंद पुन्हा फुलला. स्नेह मेळाव्याचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य रघुनाथराव आगळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रामनाथ नन्नवरे, प्रा. डॉ.अशोक एरंडे, प्रा. डॉ. संजीवनी भालसिंग, माजी उपप्राचार्य प्रा. छबुराव पानमंद, प्रा. पद्मा हिवाळे, प्रा. अशोक चौधरी, प्रा. गंगाधर फटांगरे,
प्रा. दशरथ आयनर या सेवानिवृत्तांसह उपप्राचार्या राधाताई मोटे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुनील गर्जे उपस्थित होते.माजी विद्यार्थी मेळाव्यास ५५-६० हून अधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थींनी यावेळी उपस्थित होते. माजी विद्यार्थी अशोक मुठे यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर काळे यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक घोडके यांनी आभार मानले.
माजी विद्यार्थिनी अनिता गुंजाळ, कल्पना गणगे यांच्या गेट टू गेदर संकल्पनेतून झालेला स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी सुरेखा गरगडे, रमेश गुणवंत, बाबा मोटे, महेंद्र परदेशी, अरुण शिंदे, दत्तात्रय लष्करे, गुलाब चौधरी,दत्तात्रय निपुंगे, मंगल ओहोळ, बाबासाहेब तागड, गणेश डहाळे, गोविंद चौधरी, सुभाष काळे,आरती लोखंडे,
लक्ष्मी राजगिरे,मनीषा आढाव, मनीषा परदेशी, मीनाक्षी अवचरे, भारती बेंद्रे, राजेंद्र मुंगसे, चंद्रकांत दरंदले, रावसाहेब चौधरी, राजेंद्र मोटे, रमेश खाटीक, रोहिणी मिसाळ, सुरेश सानप, शरद वाकचौरे, राजेंद्र शेटे, सोपान खाटीक, उमेश सदावर्ते, वैशाली इंगळे, विष्णू गायकवाड, भाऊसाहेब काळे, मच्छिंद्र भोसले,
स्वाती कडू, आशा वाळुंजकर, रोहिणी बेदरे, मोहन रोडगे, राजेंद्र देशमुख, आदी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी आपापली ओळख आणि मनोगते व्यक्त करताना महाविद्यालयातील दिवस,शिक्षकांचे मार्गदर्शन, सहली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि परीक्षेच्या आठवणींना उजाळा दिला.
सेवानिवृत्त प्राध्यापकांनी आपल्या मनोगतात, विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी असणे हीच शिक्षकांसाठी खरी संपत्ती असल्याचे नमूद केले. प्राचार्य रघुनाथ आगळे यांनी माजी विद्यार्थ्यांनी समाज, महाविद्यालय यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
आणि शाळेशी असलेले नाते जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले.प्रारंभी दिवंगत प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्नेह भोजनाचे मेळाव्याची सांगता करण्यात आली.
