लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी सेवा विभागीय परीक्षेचे नियोजन

1 min read

अहिल्यानगर दि.१:- लेखा व कोषागारे, मुंबई यांच्या वतीने लेखाविषयक कामकाज करणाऱ्या लिपिक वर्गीय गट-क कर्मचाऱ्यांसाठी ११ वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट-क सेवा विभागीय परीक्षा (भाग–१ व २)– २०२५ ही परीक्षा डिसेंबर २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.नाशिक विभागातील वित्त विभाग तसेच इतर विभागांमध्ये लेखाविषयक काम करणाऱ्या इच्छुक कर्मचाऱ्यांनी आपल्या विहित नमुन्यातील अर्ज ५ डिसेंबर २०२५ पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुखांकडे सादर करावेत,असे आवाहन सहसंचालक, लेखा व कोषागारे बाबुलाल पाटील यांनी केले आहे.नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्ह्यांतील वित्त विभागांसह इतर विभागांमध्ये लेखाविषयक कार्य करणारे वर्ग-३ कर्मचारी या परीक्षेसाठी पात्र आहेत. इच्छुक कर्मचाऱ्यांनी नमूद मुदतीत अर्ज भरून कार्यालय प्रमुखांकडे जमा करावेत.कार्यालय प्रमुखांनी प्राप्त अर्जांची आवश्यक छाननी करून ते १२ डिसेंबर २०२५ पर्यंत सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्याकडे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.परीक्षेसंबंधीचे तपशीलवार परिपत्रक महाकोष संकेतस्थळावर उपलब्ध असून, कर्मचाऱ्यांनी ते पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!