“नखापासून केसापर्यंत सत्तेची नशा…”, रोहित पवारांचा गुलाब पाटलांवर संताप
1 min read
जामखेड दि.३०:- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ‘लक्ष्मी’बाबतच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. “एक तारखेला घराबाहेर खाटा टाकून झोपा, कारण लक्ष्मी येणार आहे. ती येऊन म्हणेल, उठ भक्ता, झोपलायस काय उठ.”
यावरून विरोधकांनी टीका केल्यानंतर स्पष्टीकरण देताना गुलाबराव पाटलांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे त्यांच्यावर पुन्हा टीका सुरू झाली आहे. स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “लक्ष्मीचा अर्थ फक्त नोटा होत नाही, तर लक्ष्मी आपल्या आई बहिणीचंही नाव असतं.”
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुलाबराव पाटील यांच्या दोन्ही वक्तव्यांचा संदर्भ देत गुलाबरावांवर टीका केली आहे.रोहित पवार म्हणाले,“नखापासून केसापर्यंत सत्तेची नशा अंगी भिनलेला माणूस कसा बेभान होतो हे गुलाबराव पाटलांमध्ये दिसतं.
‘रात्री लक्ष्मी येणार, बाहेर खाट टाकून झोपा’ म्हणणारे गुलाबराव आता हे आईबहिणींच्या बाबतीत बोलल्याचं निर्लज्जपणे सांगतायत. राजकीय जन्म दिलेल्या पक्षाचं भान राहीलं नाही तरी किमान आया-बहिणींच्या नात्याचं तरी भान ठेवा. राजकीय स्वार्थासाठी अजून किती खालची पातळी गाठणार? महाराष्ट्रात असं राजकारण योग्य नाही!”
