“कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडं तोडून जमीन सपाट करायची?:- राज ठाकरे

1 min read

नाशिक दि.३०:- नाशिक येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी झाडे तोडण्यास विरोध दर्शवला आहे.“आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची! इतकाच विचार या सरकारचा असणार! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत!” असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!