जिल्हा परिषदेच्या आरक्षणावर १७ ऑक्टोबरपर्यंत हरकती घेता येणार
1 min read
अहिल्यानगर दि.१५:- जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागातील आणि पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाबाबत प्रारुप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत हरकत किंवा सूचना असल्यास,
त्या लेखी स्वरूपात (ता. १७) पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन महसूलचे उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निर्वाचक गणातील एकूण सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच स्त्रियांकरिता (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,
नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण स्त्रिया) राखून ठेवण्यात आलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गणाबाबत आरक्षणाची प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.याबाबत हरकत किंवा सूचना असल्यास, त्या लेखी स्वरूपात दि. १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
