दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठांत लगबग सुरु; तयार दिवाळी फराळ खरेदी वाढली

1 min read

आळेफाटा दि.१५:-जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दिवाळी खरेदीची लगबग सुरू असून तयार फराळ खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. दिवाळीत खरेदीच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या असून दिवाळी खरेदीची लगबग जोरात सुरू आहे.दिवाळी हा सण वर्षातून एकदा येणारा सण. यामुळे आनंद, उत्साह, चविष्ट फराळाचा सुगंध दरवळू लागला आहे. येणाऱ्या दीपावली सणाच्या स्वागतासाठी आळेफाटा, वडगाव आनंद या परिसरात विविध विक्रेत्यांनी फटाके, विदयुत रोषणाई साठी लागणारे रंगेबिरंगी लाइटिंग माळा, झुंबर, विविध प्रकारच्या पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केलेली दिसून येत आहे.दीपावली सण काही दिवसांवर आल्याने बाजारपेठामध्ये उत्साही वातावरण तयार झाले आहे. लहान मुलांना या आठवड्यात शाळेना सुट्टी लागणार असल्याने लहान मुले गड -किल्ले बनवण्यात मग्न आहे. तसेच कपडे, आकाशकंदील, पणत्या, विदयुत रोषणाईच्या माळा, किराणा सामान, फटाके, लक्ष्मीपूजन साहित्याची दुकाने बाजारपेठेत आली आहे. खरेदीसाठी लहान मुले, महिला वर्ग, यांची लगबग सुरु होताना दिसत आहे.यामुळे बाजारपेठा एकदम फुलून गेल्या आहे. आयता फराळ खरेदीकडे नागरिकांचा ओढ दिसून येत असून आळेफाटा येथे करंजी, चकली, अनारसे, मिठ्ठा वडा, दामटी लाडू, रवा लाडू, बेसन लाडू, बुंदी लाडू, मोतीचूर लाडू, डिंक लाडू, शंकरपाळी, म्हेंसूरपाक, डाळ, पापडी, भावनगरी, गाठी शेव, स्पेशल चिवडा, पातळ पोहे चिवडा, साधी शेव, लसून शेव, भडंग मुरमुरे, स्पेशल भेळ, गुलाबजाम, बाकर वडी, बदामी हलवा, माहीम हलवा, सोहनपापडी, नानकेट, ओल्या नारळाची बर्फी असे विविध पदार्थ तयार असून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ———
प्रतिक्रिया
‘आळेफाटा येथे गेल्या १८ वर्षापासून तयार दिवाळी फराळ श्री महालक्ष्मी केटरर्स च्या माध्यमातून विक्री करतो.नागरिक तयार फराळ मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. सर्व पदार्थ शुध्द सुर्यफुल रिफाईंड तेल व जेमिनी तुपा पासून बनविले असल्याने चविष्ट पदार्थ ग्राहकांना मिळतात. त्यामुळे दरवर्षी तयार फराळाची मागणी वाढत आहे.

राजेंद्र दिवटे, श्री महालक्ष्मी केटरर्स आळेफाटा
———–

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!