आळेफाटा येथील उपबाजारात मंगळवारी कांद्यास मिळाला तब्बल ‘इतका ‘ बाजारभाव

1 min read

बेल्हे दि.१४ :- आळेफाटा (ता.जुन्नर) येथील उपबाजारात मंगळवारी दि.१३ रोजी कांद्याच्या २२७०८ कांदा पिशवी ची आवक झाली असुन एक नंबर कांद्यास दहा किलोला १७० रूपये बाजारभाव मिळाला आहे.


जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या नीलावात एक नंबर सुपर गोळा कांद्यास दहा किलोस १५० ते १७० रूपये बाजार भाव मिळाला होता तसेच एक नंबर कांद्यास १३५ ते १४५ बाजारभाव मिळाला‌‌. दोन नंबर कांद्यास ११० ते १३५ रूपये बाजारभाव मिळला.

तर तिन नंबर कांद्यास दहा किलोस ५० ते ८० रूपये बाजारभाव मिळाला तर चिंगळी कांद्यास दहा किलोस २० ते ६० रूपये बाजार भाव मिळाला तसेच मिडीयम कांद्यास दहा किलोस ६० ते ८० रुपये बाजारभाव मिळाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे