आणे पठाराला पावसाचा तडाखा; पिके पाण्याखाली

1 min read

आणे दि.२८:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणे पठारावर गेल्या ६ ते ७ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकाला तडाखा बसला असून अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. वटाणा हब म्हणून ओळखले जाणारे आणे पठारावरती वाटाणा धोक्यात असून कांदा, जनावरांचे खाद्य, सोयाबीन, मका आदी पिकांमध्ये पावसाचे पाणी साचले असून शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. मुख्य पीक सोयाबीन संकटात आहे. पाण्यात पिके सडू लागली आहेत. पठारावरील पेमदरा, भोसलेवाडी, कारेवाडी, माळवाडी, आणे, शिंदेवाडी, नळवणे भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. शनिवार दि.२७ रोजी धो-धो पाऊस या भागात झाला. या पावसाने पेमदरा येथील भाऊ दाते, प्रशांत दाते, तान्हाजी दाते, सावकार बेलकर, रंगनाथ बेलकर, लहु बेलकर, जिजाभाऊ बेलकर, विष्णू भोसले, भिमा भोसले, खंडू भोसले, बाबाजी भोसले, तान्हाजी गायखे,शिवाजी गायखे, बाळू देवराम बेलकर, लक्ष्मण दाते, सुनिल बेलकर, जयराम दाते, कुडलीक बेलकर या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहेत. त्याचबरोबर इतरही शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या पिकाचा तत्काळ पंचनामा करून त्यांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी माजी सरपंच आनंदा बेलकर व कृषी मित्र विकास बेळकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!