उदयोजक शिवाजी गाडगे यांनी मुलाचा वाढदिवस स्वप्नवेध अनाथालयातील मुलांसमवेत केला साजरा

1 min read

निमगाव सावा दि.२८:- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील उदयोजक शिवाजी गाडगे यांनी आपला मुलगा स्वप्निल गाडगे याचा वाढदिवस मंगरूळ येथील स्वप्नवेध अनाथालयातील मुलांसमवेत साजरा करून आदर्श निर्माण केला आहे.आपण ज्या गावात लहानचे मोठे झालो, मोठे होऊन उद्योगधंद्यानिमित जरी बाहेर गेलो असलो तरीही आपण या गावचे काहीतरी देणे लागतो या उदात्त व सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेने त्यांनी या मुलांसमवेत वाढदिवस साजरा केलाच परंतु त्यांना धान्य व किराणाही यावेळी भेट दिला. या अगोदरही उदयोजक शिवाजी गाडगे यांनी स्वताचा वाढदिवस या मुलांसमवेत साजरा केला होता.या प्रसंगी उदयोजक शिवाजी गाडगे, स्वप्निल गाउगे, निमगाव सावा येथील सोसायटीच्या संचालिका प्रमिला गाडगे, जुन्नर तालुका भिमशकी संघटनेचे अध्यक्ष किरण जावळे,मा.ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गाडगे,निमगाव सावाचे गावकारभारी विजय थोरात फौजी), सुभाष नारखेडे आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!