डॉ.राजेंद्र धांडे यांनी गर्भपिशवी काढण्याची अवघड शस्त्रक्रिया केली यशस्वी
1 min read
आळेफाटा दि.२८:- धांडे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आळेफाटा (ता.जुन्नर) येथे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र धांडे यांना ४५ ते ४६ वय असणाऱ्या महिलेची गर्भपिशवी काढण्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की शनिवार दि.२७ रोजी बीपी, शुगर, थायरॉईड, वजन १०८ किलो पेक्षा जास्त
अशा समस्यांनी ग्रस्त असणाऱ्या महिलेची गर्भपिशवी काढण्याची अवघड शस्त्रक्रिया डॉक्टर राजेंद्र धांडे यांनी अवघ्या काही वेळात पूर्ण केली आहे. ऑपरेशन नंतर १२ तासाच्या आत महिला उठून व्यवस्थित चालायला लागली. त्यानंतर २४ तासात या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
रुग्णाला अशक्य वाटणारी शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वी केल्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांनी व रुग्णाने डॉक्टर धांडे यांचे हृदयस्पर्शी आभार मानले.डॉ. राजेंद्र धांडे हे प्रचंड अनुभवी प्रसिद्ध स्त्री रोग व प्रसूती तज्ञ असून काही वेळातच पेशंटचा त्रास कमी करून अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण करतात.
त्यांनी आजपर्यंत हजारो शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. यामध्ये अवघड प्रसूती, लॅप्रोस्कोपी, अत्याधुनिक दुर्बिणीतून पोटाच्या गाठीच्या शस्त्रक्रिया,अंडाशय व गर्भाशयाच्या गाठीच्या शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे कॅन्सर व छातीतील गाठीचे ऑपरेशन, व्यंधत्व चिकित्सा,
अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल, थायरॉईडचे ऑपरेशन, अशांचा समावेश आहे. त्यामुळे अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया साठी राज्यभरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात.
