श्री साईकृपा पतसंस्थेचा पहिला क्रमांक; जुन्नर सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित
1 min read
बेल्हे दि.२९:- जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीने ५१ ते १०० कोटी ठेवी असणाऱ्या मध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बेल्हे (ता.जुन्नर) येथील श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेला मिळाला आहे.या वेळी महाराष्ट्र राज्याचे अपर कमिशनर श्रीकृष्ण वाडेकर व गजेंद्र देशमुख,
सहाय्यक निबंध फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके यांच्या हस्ते नारायणगाव येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सदाशिव बोरचटे,
उपाध्यक्ष सावकार पिंगट, सचिव सूर्यकांत गुंजाळ, संचालक बाळासाहेब गुंजाळ, महादू पिंगट, मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संभेराव, ऑडिटर ज्ञानेश्वर आवटी व तालुक्यातील पतसंस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
