मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये स्त्रीशक्तीचा जागर; महिलांचा सन्मान

1 min read

बेल्हे दि.२९:- मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे (ता.जुन्नर) येथे नवरात्रीनिमित्त जागर शक्तीचा वेशभूषा स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. नवरात्री हा स्त्री शक्तीचा सण आहे, जो स्त्रीच्या सामर्थ्य, चिकाटी आणि नेतृत्वाचे प्रतीक समजला जातो अशाच प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील विविध छटा, क्षमता आणि सामर्थ्याचे प्रतीक दाखवण्यासाठी वेशभूषा स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन पूर्व प्राथमिक विभागातील माता पालक व विद्यार्थी यांच्यासाठी शाळेत केले होते. जिजाऊ आणि शिवबा, यशोदा आणि कृष्ण, भारत माता व सैनिक, से नो टू प्लास्टिक, लोकमान्य टिळक व त्यांची आई पार्वती बाई, सईबाई, महिषासुरमर्दिनी,कोळी, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन यासारख्या वेगवेगळ्या वेशभूषा सादर केल्या. माता पालकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यामागे पालक-शाळा यांच्यामधील संबंध अधिक दृढ करणे,त्यांना शाळेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय करणे, त्यांच्या कौशल्यांना वाव देणे हा हेतू असल्याचे मत प्राचार्या विद्या गाडगे यांनी या वेळी केले.तसेच आपल्या मुलांच्या आनंदासाठी पालकांनी आपला बहुमूल्य वेळ खर्च करून स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आभार मानले. शिवराज,धनश्री, रोनक,ओवी, श्राव्या, विहान, श्रीशा, प्रांजल, दिव्या, झाकी, अधीरा, कान्हा, या सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. शाळेमध्ये नेहमीच असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यामधील विविध कलागुणांना वाव मिळतो. त्यांना आपली कला सादर करण्यासाठी संधी मिळते यासाठी दातीर आजोबा यांनी बोलताना सांगितले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे व सर्व संचालक मंडळांनी महिलांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!