पूरग्रस्तांना १ टन सफरचंद; भास्कर गाडगे प्रतिष्ठानचा उपक्रम
1 min read
निमगाव सावा दि.२८:- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील भास्कर गाडगे प्रतिष्ठानच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्तांना ‘एक हात मदतीचा देत’ १ टन फळे पाठवले आहेत. मराठवाड्यात पावसाने थैमान घातल्याने अनेकांच्या घरातील साहित्य, शेतातील पिके, शेती उद्ध्वस्त झाली असून पुरामध्ये काहींची जनावरे वाहून गेली आहेत.
या भागात खाद्याचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भास्करशेठ गाडगे प्रतिष्ठानच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला असून या पूरग्रस्तांना एक टन सफरचंद व मोसंबी शनिवार दि.२७ रोजी निमगाव सावा येथून पिकअप भरून पाठवण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्कर गाडगे,माऊली खंडागळे यांसह भास्करशेठ गाडगे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भास्कर गाडगे प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच राज्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थिती मदत केली जाते. दुष्काळी धान्य, जनावरांना चारा पाठवला जातो.मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलकांना मदत, तसेच कोरोना काळात प्रतिष्ठानेणे मोठी मदत केली होती.
