तामिळनाडूत अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 36 जणांचा मृत्यू तर 46 जखमी

1 min read

चेन्नई दि.२८:- तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यात तमिळगा वेत्री कळगम (TVK) प्रमुख आणि अभिनेत्यापासून नेते बनलेले विजय थलपतीच्या मोठ्या राजकीय रँलीत प्रचंड गर्दी झाली.

दहा हजारो लोक जमल्याने परिस्थिती बिघडली आणि चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. यात किमान 36 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अनेकजण बेशुद्ध पडले आणि त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज भासली. या घटनेत 46 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.टीव्हीके प्रमुख विजयने शनिवारी प्रचारासाठी करूरला भेट दिली. त्याला पाहण्यासाठी आणि त्याचं भाषण ऐकण्यासाठी हजारो लोक जमले होते. करूर हे द्रमुकचा गड मानलं जातं, त्यामुळे विजयच्या प्रचारासाठी बरीच गर्दी जमली होती. मात्र, याच प्रचंड गर्दीचं रुपांतर दुर्घटनेत झालं. विजयच्या भाषणानंतर काही वेळातच गर्दीमुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अनेक लोक बेशुद्ध पडले. रिपोर्टनुसार, उष्णता, पाण्याचा अभाव आणि गर्दीमुळे अनेक महिला, पुरुष आणि मुलं बेशुद्ध झाली. बेशुद्ध झालेल्या लोकांना तातडीनं करूर सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं.गर्दीमुळे अनेक लोक, त्यात काही मुलेसुद्धा, बेशुद्ध पडली. विजय यांनी अचानक आपलं भाषण थांबवलं आणि “पोलिसांनी मदत करा” अशी हाक दिली. लोक बेशुद्ध पडल्यावर त्यांनी पाणी बाटल्या प्रेक्षकांत टाकल्या आणि रुग्णवाहिका बोलावून श्वास गुदमरलेल्या लोकांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. विजय यांच्या भाषणादरम्यान गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि लोकांना श्वास घेणं अवघड झालं. अनेक कार्यकर्त्यांनी परिस्थितीची जाणीव होताच सतर्कतेचा इशारा दिला. मात्र रुग्णवाहिकांना गच्च भरलेल्या गर्दीतून वाट काढणं अवघड झालं. बेशुद्ध पडलेल्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यापैकी काहींचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.करूर सरकारी रुग्णालयात एकाच वेळी दहाहून अधिक रुग्णवाहिका आल्या, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला. डॉक्टरांनी आपत्कालीन उपचार केले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच करूर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सरकारी रुग्णालयात धाव घेतली. तेथे त्यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी उपचार आणि आवश्यक उपाययोजनांबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेतला. अधिकाऱ्यांनी तातडीनं अतिरिक्त डॉक्टर, नर्स आणि औषधांची व्यवस्था केली. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. त्यांनी तातडीनं मंत्री अनबिल महेश यांना करूरला जाण्याचे आदेश दिले. मंत्री करूर सरकारी रुग्णालयाला भेट देतील आणि उपचारांच्या उपाययोजनांचं निरीक्षण करतील. मृतांच्या कुटुंबियांसाठी तात्काळ मदत जाहीर केली जाण्याची अपेक्षा आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!