राजुरीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

1 min read

राजुरी दि.१३:- राजुरी येथील एका शेतक-याच्या वासरावर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की राजुरी (ता.जुन्नर) येथील‌ येमाई तुकाई मळ्यात रहात असलेले नामदेव हाडवळे यांचा घराजवळ गायांचा मुक्त गोठा असुन मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांणा गायांचा मोठा ओरडण्याचा आवाज आला असता ते गोठयाजवळ गेले असता त्यांणा वासरू दिसले नाही.

म्हणुन त्यांणी आजु बाजुला पाहीले असता गोठया जवळच असलेल्या शेतात बिबटया त्या वासराजवळ दिसला हाडवळे यांणी मोठयाने आवाज केल्याने बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला.या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात सहा ते आठ महिण्याचे वासरू ठार झाले असुन घटनास्थळी वन अधिकारी यांची भेट दिली.

दरम्यान राजुरी परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत चालले असुन या परिसरात बिबट्यांणा पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक कुंडलिक हाडवळे यांणी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे