जुन्नरच्या तरुणाच तहसीलदारा विरोधात पुण्यात शोले स्टाईल आंदोलन
1 min read
पुणे दि.३०:- शिवाजीनगर (पुणे) येथे शिरोली- सुलतानपूर (तालुका – जुन्नर) च्या महेंद्र वसंत डावखर याने पुलावरून शोले स्टाइल आंदोलन केले असून उडी मारण्याची धमकी दिली. जमिनीची नोंद जुन्नर तहसीलदार यांचेकडून व प्रांत कडून नामंजूर केल्याच्या नैराश्य पोटी चढला पुलावर असल्याची माहिती समोर येत आहे. तर संबंधित तरुणाने व त्याच्या वडिलांनी केलेली मागणी माझ्या अधिकार कक्षेच्या बाहेर असल्याची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.
या बाबत सविस्तर माहिती अशी की आज (दि.३०) पुण्यातील संचेती रुग्णालयाजवळील उड्डाणपुलावर चढून या तरुणानं शोले स्टाईल जीवघेणं आंदोलन सुरु केले. जुन्नरच्या तहसीलदारांवर कारवाईची मागणी करणारा फलक हातात घेऊन तो पुलाच्या खांबावर जाऊन बसला होता.
यामुळं या चौकात वाहतूक कोंडी झाली होती. तर नागरिकांनी नक्की काय सुरु आहे हे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. संबंधित तरुणाने संचेती चौकातील उड्डाणपुलाच्या खांबावर चढून आंदोलन केले. इतक्या उंचावरून उडी मारण्याची तो धमकी देत होता. त्याने हातात एक फ्लेक्स घेतला होता त्यावर जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई करण्यात यावी, असा मजकूर लिहिला होता.
दरम्यान, घटनास्थळी पोलिसही दाखल झाले व असून या तरुणाच्या बचावासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. पण पोलिसांनाही त्यानं उडी मारण्याची धमकी देत जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई करावी ही आपली मागणी लावून धरली.
“संबंधित तरुणाने व त्याच्या वडिलांनी केलेली मागणी माझ्या अधिकार कक्षेच्या बाहेर आहे. कोणतीही प्रशासनाला पूर्वकल्पना न देता तरुणाने आज आंदोलन केले.नुकतच तरुणाने आंदोलन मागे घेतले आहे.”
रवींद्र सबनीस
तहसीलदार,जुन्नर