आंबेगाव चे प्रसिद्ध बटाटा व्यापारी सोपान रासकर यांचं दुःखद निधन

1 min read

सातगाव दि.२५:- आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावरचे सन 1952 पासूनचे पहिले हुंडेकरी आणि पेठ (आंबेगाव) गावचे प्रसिद्ध बटाटा व्यापारी, सोपान मारुती रासकर वय (91) यांचे सोमवारी निधन झाले. सातगाव पठारावर शिमल्यावरून रेल्वे वाघिणीने बटाटा बियाणे आणून शेतकऱ्यांना लागवडीसाठी उधारीवर पुरवत होते. बटाटा काढणीनंतर त्याची विक्री मुबई मार्केट मध्ये करून त्याची पट्टी आणि रक्कम शेतकऱ्यांना घरपोच करत होते. बटाटा निघाला नाही तर शेतकऱ्याकडून बियाणे रक्कम वसूल करत नव्हते. बटाटा पिकलाच नाही तर शेतकरी कुठून पैसा देणार अशी त्यांची भावना होती. पंजाबला जाऊन बटाटा बियाणे कस खरेदी करायचे ही कला अनेक शेतकऱ्यांना त्यांनी शिकवलं. 1995 पासून वेफर्स बटाटा बियाणे पुरवून चांगला पैसा शेतकऱ्यांना मिळून दिला.त्यांचा मुलगा डॉक्टर भरत रासकर यांनी ऊसामध्ये पीच डी केली. त्यांनी मध्यवर्ती उस संशोधन केंद्र. पाडेगाव केंद्राचे प्रमुख आणि उस विशेषज्ञ या पदावर काम केले. त्यांनी उसाच्या 5 नवीन जाती शोधून काढल्या. 2024 पासून सेवा समाप्ती नंतर राज्यभर शेतकरी आणि साखर कारखाने यांना एकरी 100 टन उस उत्पादनासाठी सल्ला देत आहे.नातू अक्षय भरतt रासकर हे के पी एम जी या जागतिक कंपनी मध्ये डायरेक्टर आहे. नात गौरी भरत रासकर ही आर टी ओ अधिकारी आहे. सोपानराव रासकर यांना आप्पा म्हणून सर्वजण ओळखत होते. गावात आणि तालुक्यात बटाटा व्यापारी म्हणून परिचित होते.त्यांच्या निधनाने पंचक्रोशीतील शेतकरी हळहळ करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!