पुण्यात चाकण एमआयडीसीत अपघात, एकाचा मृत्यू

1 min read

पुणे दि.२४:- पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसीमध्ये एका ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याचा मित्र जखमी झाला आहे.

नेमकं काय घडलं?
२० सप्टेंबर रोजी पहाटे २:५० च्या सुमारास, सुभजित गोस्वामी आणि त्याचा मित्र तुफान दिलीप मंडल हे त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १४ एमएन ३१७४) कंपनीत कामावर जात होते. इंडुरन्स चौकाजवळ ते उजवीकडे वळण घेत असताना, मागून भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रकने (क्र. एमएच १४ एलएक्स ९३२८) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात तुफान मंडल (वय २५) याचा जागीच मृत्यू झाला, तर सुभजित गोस्वामी किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!