अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत द्या- राहुल ढेंबरे

1 min read

अहिल्यानगर दि.१८:- अस्मानी सुलतानी संकट बळीराजाची पाठ सोडायला तयार नसतानाच संपूर्ण महाराष्ट्रभर दि.९ पासून संततधार अतिवृष्टीचा तडाखा बळीराजाला बसला असून शेतातील उभी सर्वच पिके, साठवलेली अन्नधान्य, कांदा, घरे, गोडाऊन आणि पाळीव पशु-पक्षांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे, आपल्या स्तरावर बळीराजाला या संकटातून सावरण्यासाठी योग्य ती आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आणि कष्टकरी बांधवांकडून आपणास कळकळीची विनंती शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना.दत्तात्रय भरणे,नरेंद्र मोदी,पंतप्रधान भारत सरकार, देवेन्द्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन
अजित पवार, उपमुख्यंमत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यंमत्री महाराष्ट्र यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!