बीडकरांचे स्वप्न साकार; बीड – अहिल्यानगर रेल्वे मार्गाचा शुभारंभ

1 min read

बीड दि.१८:- स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा “ड्रीम प्रोजेक्ट” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड अहिल्यानगर या रेल्वे मार्गाचा शुभारंभ मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी जिल्हाभरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हावासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता.स्व मुंडे साहेबांच्या निधनानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ड्रिम प्रोजेक्टमध्ये विशेष लक्ष दिले. जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मी आणि खासदार प्रितम मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकल्पाचा समसमान वाटा उचलला आणि भरभरून निधी प्रकल्पासाठी वर्ग झाला. खासदार प्रितम मुंडे यांनी वेळोवेळी या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याचा कामगिरीचा व्यक्तिगत आढावा घेऊन पाठपुरावा केला. मी देखील वेळोवेळी केंद्राने राज्य सरकारची संपर्क साधून या प्रकल्पाला बळकट केले.आज नव्याने शुभारंभ झालेला हा प्रकल्प लवकरच परळी बीड अहिल्यानगर पर्यंत पूर्णत्वास जाऊन बीड जिल्ह्याच्या विकासाची जीवन वाहिनी होईल हा विश्वास आहे.असे पालक मंत्री यांनी व्यक्त केले.या प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, रेल्वेचे अधिकारी, मा.खा.केशरकाकू क्षीरसागर, अमोल गलधर, नामदेव क्षीरसागर, विद्यार्थी रेल्वे कृती समिती यांच्या समवेत रेल्वेसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्व आजी-माजी खासदारांचे, नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे सर्वांचे अभिनंदन.या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, खा.बजरंग सोनवणे, आ.धनंजय मुंडे, आ.नमिता मुंदडा, आ.विजयसिंह पंडीत, आ.विक्रम काळे, मा.आ.भिमराव धोंडे, मा.आ.संजयभाऊ दौंड, योगेश क्षीरसागर, समीर काजी, जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, CEO जितीन रहेमान, जनरल मॅनेजर सेंट्रल रेल्वे धरमवीर मीना, DRM पुणे राजेश कुमार वर्मा, मुख्य इंजिनीअर रजनीश माथूर, प्रमुख ऑपरेटिग मॅनेजर श्यामसुंदर गुप्ता यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!