राजुरीत महिलांसाठी चारचाकी वाहन प्रशिक्षणास सुरुवात; महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे ही काळाची गरज:- अतुल बेनके

1 min read

राजुरी दि.१३:- महिलांना स्वावलंबी बनविणे आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने राजुरी ग्रामपंचायतीने 15 वा वित्त आयोग निधी अंतर्गत एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गावातील होतकरू व गरजू महिलांसाठी विशेष चारचाकी वाहन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून. या उपक्रमाचा शुभारंभ माजी आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते व गावातील सर्वच प्रमुख मान्यवरांच्या सन्माननीय उपस्थित संपन्न झाला. शुभारंभप्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणासाठी गावातील विविध वयोगटातील महिलांनी नावनोंदणी केली असून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षकांकडून आस्था सोशल फाउंडेशन यांचे मार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.या वेळी बोलताना माजी आमदार अतुल बेनके म्हणाले, “महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे ही काळाची गरज आहे. वाहन चालविण्याचे प्रशिक्षण मिळाल्याने केवळ रोजगारच नव्हे तर आत्मविश्वास देखील वाढेल. गावोगाव अशा उपक्रमांची गरज आहे आणि राजुरी ग्रामपंचायतीने दाखवलेला पुढाकार खरंच कौतुकास्पद आहे.”यापूर्वी ग्रामपंचायतने महिलांसाठी शिवणकला, फुड प्रो्सिंसिंग, बॅग मेकिंग अश्या वेगवेगळ्या प्रकारांचे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेली आहेत.“या उपक्रमामुळे महिलांना केवळ वाहनचालक म्हणून संधी मिळणार नाही,तर विविध सरकारी व खासगी योजनांमध्येही त्या सहभागी होऊ शकतील. पुढील काळात महिलांसाठी संगणक प्रशिक्षण,उद्योजकता विकास अशा विविध प्रशिक्षण योजनाही राबविण्याचा मानस आहे. असे सरपंच प्रिया हाडवळे यांनी सांगितले.प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेल्या एका महिलेने सांगितले, “आम्हाला आतापर्यंत वाहन चालविण्याची संधी मिळाली नव्हती. या शिबिरामुळे आमचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यात स्वतःचे वाहन चालवून रोजगार मिळवता येईल.” कार्यक्रम प्रसंगी ग्रामनेते दिपक औटी,सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, बाळासाहेब औटी, एम डी घंगाळे, एकनाथ शिंदे, चंद्रकांत जाधव, सखाराम गाडेकर, रंगनाथ औटी, शाकीरभाई चौगुले, गौरव घंगाळे, रुपाली औटी, सुप्रिया औटी, पांडुरंग पवार, स्नेहल शेळके, बाळासाहेब औटी, वल्लभ शेळके, जयसिंग औटी, पपु हाडवळे, लक्ष्मण घंगाळे, हेमलता शिंदे, संगीता शेळके, संगीता हाडवळे, जि. के औटी, कारभारी औटी, अशोक हाडवळे, नंदकुमार हाडवळे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ,पालक व महिला भगिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपा शिंदे यांनी केले तर आभार ग्रामपंचायत अधिकारी संदीप ढोरे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!