कुकडी नदीवरील रेनवडी कोल्हापूर बंधारा दुरुस्त करा:- पांडुरंग पवार
1 min read
आणे दि.१३:- कावळ पिंपरी (ता.जुन्नर) येथील कुकडी नदीवरील रेणवडी कोल्हापूर बंधाऱ्याचे रेलिंग तुटून अपघात ग्रस्त झाला असून भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी या बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत गुणाले, कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर,पुणे परिमंडळ अधिकारी वैशाली नारकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.
पांडुरंग पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुन्नर व पारनेर तालुक्यातील रेनवडी व पिंपरीकावळ दरम्यान कुकडी नदीवर सन १९९५ चे दरम्यान कोल्हापुर पदधतीचा बंधारा बांधण्यात आला आहे.
या कोल्हापूर बंधाऱ्यामुळे पिंपरीकावळ, पारगांव तर्फे आळे, मंगरुळ, रेनवडी आदि गांवातील शेतक-यांना सिंचनाचा लाभ होतो.
शिवाय या बंधारावरुन येणे जाणे साठी रस्ता असुन त्यामुळे पुणे व अहिल्यानगर येथील ग्रामस्थांची चांगली सोय झालेली आहे. तथापि अनेक वर्षापुर्वी बंधारा झालेमुळे दोन्ही काठचा भरावा काही अशी वाहुन गेला आहे.
तसेच पुलावरील रेलिंग सुदधा तुटले असुन अचानक एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आपण याबाबत आवश्यक ती उपाय-योजना करणे बाबत सबंधितांना योग्य ते आदेश दयावेत.