राजुरीतील जि.प. शाळेच्या नवीन इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही:- अतुल बेनके
1 min read
आळेफाटा दि.१३:-“राजुरी या ठिकाणी चालू असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नवीन इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही,” असे आश्वासन माजी आमदार अतुल बेनके यांनी दिले.राजुरी (ता. जुन्नर) येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीच्या १० वर्ग खोल्यांसाठी सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला असून त्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, त्यात समितीचे माजी सभापती दीपक औटी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य स्नेहल शेळके, त्याच्या सरपंच प्रिया हाडवळे उपसरपंच, माऊली शेळके,
वल्लभ शेळके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कुंडलिक हाडवळे, ग्राहक पंचायतीचे बाळासाहेब आवटे मुसलमानजमातीच्या सदर शाकीर चौगुले, गणेश सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष सुभाष औटी, शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम. डी. घंगाळे, मिलिंद पंधारे, मुरलीधर औटी, कारभारी औटी, जयसिंग औटी,
गोरक्ष हाडवळे, बाळासाहेब हाडवळे, एकनाथ शिंदे, कल्पना बांगर, नितीन औटी, बबन हाडवळे, जि. के. औटी, मंगेश औटी, ग्रामपंचायत अधिकारी संदीप ढोरे, शालेय व्यवस्थापन अध्यक्षा रूपाली औटी आदी उपस्थित होते. यावेळी आमदार अतुल बेनके यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दहा वर्गखोल्यांसाठी
सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा राजुरी गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पांडुरंग पवार, प्रिया हाडवळे यांची भाषणे यावेळी झाली. मधुकर उनवणे यांनी केले. मुख्याध्यापक सयाजी हाडवळे यांनी प्रास्ताविक केले. एम. डी. घंगाळे यांनी आभार मानले.