हरीनामाच्या गजराने दुमदुमली बेल्हे नगरी

1 min read

बेल्हे दि.९:- श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे बेल्हे (ता.जुन्नर) शुक्रवार (दि.९) गावात आगमन झाले. ग्रामस्थांनी पालखीचे भक्तीभावाने स्वागत केले. पालखी शिवाजी डुंबरे यांच्याकडे घरी दुपारच्या विसाव्या साठी थांबली तेथे डुंबरे परीवारा तर्फे स्वागत करून वारकर्यांना अल्पोपहार दिला. उन जास्त असल्यामुळे थंड पाण्याची सोय करन्यात आली होती. मसाला दुध व चिक्की चा अस्वाद घेऊन पालखी विठ्ठल नामाच्या घोषात पंढरपुर कडे मार्गास्थ झाली.

श्री बाबाजी चैतन्य महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरू श्री क्षेत्र उत्तमापूर अत्ताचे ओतूर येथे बाबाजी चैतन्य महाराज याची समाधी असुन येथुन हा पालखी सोहळा पंढरपुर वारी साठी निघते.गेल्या दोन ते तीन वर्षे च्या तुलनेत यंदा पालखी सोहळ्यात भाविकांची गर्दी दिसून येत असुन वारकर्यांचा उस्साह ओसंडुन वहात आहे.

उन्हाची पर्वा न करता पुरूषांच्या बरोबरीने स्रियांची संख्याही वारी करन्यासाठी जात जास्त दिसून येत आहे.श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळ्याचे हे ६३ वे वर्ष आहे शके १९४४ रोजी ह.भ.प.वै.सहादुबाबा वायकर महाराज यांनी ह्या सोहळ्याची सुरवात केली. संत तुकाराम महाराज यांचे चैतन्य महाराज हे गुरू आहेत. अशा या महान संत तुकाराम महाराज यांच्या गुरूचा हा पालखी सोहळा बेल्हे नगरीत आला. त्यामुळे बेल्हे नगरी हरीनामाच्या गजराने दुमदुमली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे