पुणे जिल्हा परिषेदचे अध्यक्षपद ‘सर्वसाधारण’
1 min read
पुणे दि.१३:- राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी काल जाहीर करण्यात आली. या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मागील वेळी हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले होते.पुण्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि अहिल्यानगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अनुसूचित जमाती (महिला) साठी निश्चित करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांतील सभापतिपदासाठीही आरक्षण जाहीर झाले आहे. पंचायत समिती सभापतीसाठी एक जागा अनुसूचित जातीसाठी, एक जागा अनुसूचित जमातीसाठी (महिला), दोन जागा मागास प्रवर्गासाठी,दोन जागा मागास प्रवर्ग महिलांसाठी, ३ जागा सर्वसाधारण गटासाठी,
४ जागा सर्वसाधारण (महिला) साठी राखीव असणार आहे. दरम्यान,आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्या दृष्टीने हे आरक्षण महत्त्वाचे मानले जाते.आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुकांना बळ मिळणार आहे.त्यानुसार त्यांना आतापासूनच मोर्चेबांधणी ही करण्यात येणार आहे.
आता, ग्रामीण भागात राजकीय हालचाली व समीकरणे जुळवण्यास सुरुवात झाली आहे. आता, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी असणार आहे, ते जाहीर झाल्याने बहुतेक राजकीय पक्षांना आता पुढील आखणीसाठी दिशा निश्चित झाली आहे.