भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन
1 min read
तुळजापूर दि.१२:- भगवान गडाचे महंत तसेच पारंपरिक वारकरी संप्रदायातील प्रवचनकार व कीर्तनकार डॉ. नामदेव शास्त्री सानप यांनी आज श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.श्री तुळजाभवानी देवींची आरती करत त्यांनी कुलधर्म व कुलाचार पार पाडले. महंत डॉ. सानप हे शैक्षणिक क्षेत्रातही प्रख्यात असून त्यांनी वाराणशी विद्यापीठातून न्यायाचार्य पदवी प्राप्त केली आहे. तसेच ‘वारकरी संप्रदायाची कुटरचना’ या विषयावर त्यांनी संशोधन करून पीएच.डी. पदवीही संपादन केली आहे.धार्मिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या वेळी संस्थानच्यावतीने त्यांना श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली.यावेळी मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडकर, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, सहायक सुरक्षा निरीक्षक दीपक शेळके, स्वच्छता निरीक्षक मनोज घोडगे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.