कल्याण – अहिल्यानगर महामार्ग अपघाताची मालिका सुरू; कासव गतीने काम सुरू
1 min read
बेल्हे दि.१२:- कल्याण- अहिल्यानगर महामार्गावरती अपघाताची मालिका गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. आळेफाटा ते बेल्हे या रस्त्यावरती कासवगतीने काम सुरू असल्यामुळे वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आळे ते बेल्हे रस्त्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण स्थितीमध्ये झालेले नाही. गुरुवार दि.११ रोजी छोटा हत्ती व पिकअपचा अपघात झाला. दोन्ही वाहने एकमेकांना घासून रस्त्याच्या खाली शेतामध्ये गेले. या अपघातात दोन्ही चालक जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी दिघे वस्ती माळवाडी येथील मच्छिंद्र बोरचटे यांची दुचाकी कठाऱ्यावरती स्लीपर होऊन अपघात झाला.
यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. काम चालू असलेल्या ठिकाणी सिंगल साईटचा रस्ता चालू आहे तो अरुंद असून बाजूच्या साईट पट्ट्या व्यवस्थित न भरल्यामुळे वाहन चालक वाहने खाली उतरत नाहीत. गेले दीड महिन्यात दहा ते पंधरा दुचाकी स्वरांचे अपघात झाले आहेत.
तात्काळ गॅस साईट पट्ट्या भरावया व चांगल्या दर्जाचे काम करावे अशी मागणी आनंद गुंजाळ, रामा गुंजाळ, भागचंद्र बोरचटे, सिद्धेश गुंजाळ, सचिन गुंजाळ, बाळासाहेब तांबे, भाऊसाहेब गुंजाळ, केरभाऊ गुंजाळ यांनी केली आहे. अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
प्रतिक्रिया
“साईड पट्ट्या एकदा भरल्या आहेत परंतु पावसामुळे पुन्हा खचल्या आहेत. दोन दिवसात टाईप पट्ट्या भरल्या जातील. व शासकीय पेमेंट वेळेत मिळत नसल्याने काम संथ गतीने सुरू आहे.
डी.जी बेल्हेकर
कॉन्ट्रॅक्टर, कल्याण- अहिल्यानगर महामार्ग