मंगरूळ गावात पहिलीच बस सुरू; ग्रामस्थांनी केला आनंद उत्सव
1 min read
बेल्हे दि ११:- मंगरूळ (ता.जुन्नर) गावातून सुरू होणारी मंचर आगाराची ही पहिलीच बस असून मंगरूळ ते मुंबई (परळ) व मुंबई ते मंगरूळ अशी ही बस असणार आहे. गावात बस सुरू झाल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. गावचे आयएएस अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी,
ग्रामपंचायत सरपंच मनीषा खिलारी,कात्रज दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी व ग्रामस्थांच्या पुढाकाराने ही सुरू झाली आहे. गावात बस आल्याने सर्व ग्रामस्थ आनंदी झाले. बस चालक व वाहकाचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. बसला नारळ फोडून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
या बसचे सकाळी ७.०० वा. मंगरूळ येथुन प्रस्थान होते तर रात्री ११.३० वा. परळ (मुंबई) येथून परत येते.
बसचा मार्ग:- मंगरूळ -पारगाव – भागडी – वळती- रांजणी – मंचर – चाकण- लोणावळा – पनवेल – परळ अशी जाते तर येताना:- परळ-पनवेल -लोणावळा-चाकण-मंचर-नारायणगाव-आळेफाटा-बेल्हे-साकोरी-मंगरुळ अशी येते.
सदर बससेवा सुरू झाल्याने मंगरूळ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची तसेच मुंबई व इतर ठिकाणी राहणारे नोकरदार तसेच रहिवाशी यांची मोठी सोय झाली आहे.