समर्थ महाविद्यालयात ज्ञान, स्पर्धा, करिअर व नवीन उत्सवाचा संगम
1 min read
बेल्हे दि.१०:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालय, बेल्हे महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,माजी जि.प. सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत प्राचार्य डॉ. उत्तम शेलार, डॉ. लक्ष्मण घोलप, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले
की आजच्या आधुनिक व स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले कौशल्य व तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयातील प्रत्येक विभागामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला सदैव प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी केवळ शिक्षणातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात.
व स्वतःची ओळख निर्माण करतात. विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान,आधुनिक व्यवसाय आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला व व्यावसायिक तंत्रज्ञानाला चालना देणाऱ्या विषयावर विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये संतोष सांगवे यांनी व्यक्तिमत्व विकास ही काळाची गरज आहे.
या विषयावर संवादत्मक मार्गदर्शन करत आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि संघभावनेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. संतोष गुजर यांनी विद्यार्थ्यांना सायबर सेक्युरिटी, क्लाऊड कॉम्पिटिशन, डाटा सायन्स या नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. तसेच इंटरनेट वापरातील धोके व संरक्षणाचे उपाय स्पष्ट केले.
प्रा अर्चना निगडे यांनी आयटी क्षेत्रातील करिअर, आव्हाने, नोकरी किंवा व्यवसाय मधील पद्धती समजून सांगितल्या. डॉ. मंगेश वाघमारे यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःचा उद्योग उभा करून तो समाजाला उपयोगी कसा पडेल, छोट्या छोट्या कृतीतून नव-नवीन संकल्पना अमलात आणाव्यात याविषयी विद्यार्थ्यांना जागरूक केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे कॉम्प्युटर विभागाचे बोर्ड ऑफ स्टडी डायरेक्टर डॉ. विलास वाणी यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणातील, अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजावून सांगितले.या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.त्यामध्ये पोस्टर सादरीकरण स्पर्धा, संगणक प्रश्नमंजुषा स्पर्धा,
व्यवसायिक प्रश्नमंजुषा स्पर्धा,निबंध लेखन स्पर्धा. या स्पर्धेमध्ये ४६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्वाधिक गुणप्राप्त विद्यार्थ्यांचा व स्पर्धेमध्ये क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावर्षी समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयात १०० टक्के प्रवेश झाल्याने सर्व विभाग प्रमुख,
प्राध्यापक,कर्मचारी यांचा विशेष गौरव करण्यात आला. समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थी स्वागत समारंभ इंडक्शन २०२५ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि आत्मविश्वास देणारा ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. प्रणाली साळुंखे, प्रा. प्रशांत काशीद, प्रा. योगेश राऊत,
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनेश जाधव, प्रा. राजश्री जाधव यांनी प्रयत्न केले. प्रा. प्राजक्ता रायकर व प्रा. पल्लवी हाडवळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. गणेश बोरचटे यांनी सर्वांचे आभार मानले.