भविष्याची दिशा ओळखून कौशल्य प्राप्त करावे:- प्रा. श्रीकांत पाचपुते
1 min read
नारायणगाव दि.१०:- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भविष्यातील दिशा ओळखून त्या अनुषंगाने ज्ञान व कौशल्य प्राप्त करावे. समाजातील गरज ओळखून आपल्या करिअरशी त्याचा संबंध जोडावा. आयुष्यात नवी झेप घेण्याची तयारी ठेवा. जीवनात ध्येय ठेवून जिद्द आणि चिकाटीच्या आधारे मेहनत केली तर यश नक्की मिळते, असे मत प्रा. श्रीकांत पाचपुते यांनी व्यक्त केले.ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथे कला शाखेच्या अंतर्गत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या वेळी पाचपुते बोलत होते. या दिवशी कला शाखेतील विद्यार्थ्यांनी प्राचार्य व शिक्षकांच्या भूमिकेत अध्यापनाचे कार्य केले. विद्यार्थी ओम वर्षे, नलेश आढावे, ज्योत्स्ना लोणे,
रेणुका कुलकर्णी, धनश्री भिसे, निकिता सोनावळे, शुभदा हाडवळे यांनी मनोगत व्यक्त केली.हा उपक्रमासाठी प्रा. प्रतिभा मोहिते, डॉ. सचिन रूपनर, प्रा. वैभव शिंदे, प्रा. अश्विनी गायकवाड, प्रा. पूजा वाव्हळ, प्रा. अक्षय भोर, प्रा. सगुरू जाधव, प्रा. विशाल उंडे, प्रा. कुणाल सोनवणे व प्रा. सुरक्षा पाटील यांनी सहकार्य केले.
सेजल चानोदिया व चैताली नाईक यांनी सूत्रसंचालन केले. उत्कर्षा घोडेकर हिने आभार मानले. या वेळी वडगाव कांदळी येथील हिंदमाता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुनील जाधव, नारायणगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी,
कला शाखा समन्वयक डॉ. शरद कापले अर्थशास्त्र संशोधन केंद्र समन्वयक डॉ. श्रीकांत फुलसुंदर, डॉ. अनिल काळे, डॉ. उत्तम पठारे, डॉ. राहुल गोंगे, डॉ. दिलीप शिवणे, डॉ. लहू गायकवाड व डॉ. विनायक कुटे उपस्थित होते.