निमगाव सावा व वाकी बुद्रुक दुर्घटनेतील मृतदेह शोधण्यात रोहित नरवडे फाउंडेशनची कामगिरी
1 min read
आळेफाटा दि.१०:- बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील रोहित नरवडे फाउंडेशनच्या तरुणांनी निमगाव सावा तसेच वाकी बुद्रुक येथे विसर्जन गणपती विसर्जना दरम्यान पाण्यात बुडालेल्या तरुणांच्या मृतदेहांचा तात्काळ शोध घेतला. त्यामुळे या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. असून चाकण नगर परिषदेच्या वतीने तुमचा सन्मान करण्यात आला.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, वाकी बुद्रुक येथील गणेश विसर्जना दरम्यान पाण्यात बुडवलेला अभिषेक अशोक भागरे (वय २१) रा.कोळी आळी, तालुका खेड,जिल्हा पुणे याचा मृतदेह मंगळवारी चौथ्या दिवशी शोधण्यात रोहित नरवडे फाउंडेशननी घेतलेल्या शोध मोहिमेला यश आले.
या वेळी आपदा मित्र, एनडीआरएफ टीम, प्रशासन यांनी शोध मोहीम थांबवली होती. दरम्यानच्या काळात नातेवाईकांनी निर्णय घेत रोहित नरवडे यांना संपर्क केला व त्यांच्या फाउंडेशनने तात्काळ येथे मदत कार्य सुरू केले. सदर रोहित नरवडे फाउंडेशन चे कार्य बघून लोकांनी त्यांचे कौतुक केले.
चाकण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अंकुश जाधव, पुणे फॉरेस्ट अधिकारी रत्नेश शेवकरी, चाकण पोलीस स्टेशनचे पीएसआय अक्षय मोते, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गोसावी यांनी बुधवार दि.१० रोजी चाकण येथे रोहित नरवडे फाउंडेशनचा सन्मान करून सर्व टोलचे आभार मानले.
फाउंडेशनचे कौतुक करून या फाउंडेशन मधील मुलांना आपत्कालीन व्यवस्थापन व फायर व वन खात्यामध्ये सामील होण्याचा प्रस्ताव पुणे जिल्हा अधिकारी यांच्याकडे दिला आहे. तसेच अशोक खंडू गाडगे निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे दिनांक ६ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जना निमित्त पाण्यात पाय घसरून पडला असता तब्बल २४ तास एनडीआरएफ व प्रशासन त्याचे शोध मोहीम घेत होते.
परंतु त्यांना यश येत नव्हते. त्यादरम्यान गावकऱ्यांनी रोहित नरवडे फाउंडेशन यांना संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ मदत कार्य करून फक्त अर्ध्या तासात सदर व्यक्तीचा मृतदेह पाण्यातून शोधून काढला. त्यामुळे गावकऱ्यांनी व प्रशासनाने रोहित नरवडे व बबलू बोरसे, किरण बोरसे, महेश भांगरे, सचिन भांगरे, दीपक सूर्यवंशी, आदी पवार, सनी पवार, राहुल साळवे,
आकाश माळी कौतुक केले. सदर फाउंडेशन च्या टीमला आपत्कालीन व्यवस्थापन मध्ये सामील करून घ्या असा आग्रह जुन्नर करांनी व तालुक्यातील नेत्यांनी धरला.