श्री स्वामी समर्थ मंदीरात चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास मुद्देमालासह अटक; मंचर पोलिसांची कारवाई

1 min read

मंचर दि.१०:- मंचर ता. आंबेगाव येथिल श्री स्वामी समर्थ महाराजाचे मंदीर नेहमी प्रमाणे ३१ ऑगस्ट रोजी रात्रीची आरती झालेनंतर रात्रौ ८.३० वाजण्याचे सुमारास बंद करण्यात आलेले होते. त्यानंतर रात्रौ ८.३० वा ते दिनांक १/९/२०२५ रोजी सकाळी ०६.०० वाजण्याचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदीराचे कशानेतरी कुलूप तोडून मंदीरात प्रवेश करून मंदीरातील अंदाजे ७५० ग्रॅम वजनाचे ६५,०००।- रूपये किंमतीच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे चांदीचे पादूका चोरी नेल्या आहेत. सदरबाबत चोरीबाबत शेखर एकनाथ जाधव वय ४२ वर्षे रा. भैरवनाथ गल्ली, मंचर ता. आंबेगाव यांनी मंचर पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेवरून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल मांडवे साो, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग खेड, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी गुन्हयाचे तपासकामी तपास पथकाची नेमणूक करून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे करीता सूचना व मार्गदर्शन केलेनंतर तपास पथकातील सहा पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पोलीस हवालदार शरद कुलवडे, पोलीस अंमलदार योगेश रोडे, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार हनूमंत ढोबळे, पोलीस अंमलदार सुनिल काठे, असे दिनांक ५/९/२०२५ रोजी गुन्हयातील फरारी आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषण व जनतेचे सहकार्याने श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदीरातील पादूकांची चोरी करणारा इसम नामे भो-या उर्फ भावडया वाल्मीक पथवे वय २६ वर्षे रा. पांगरी कोतूळ, ता. अकोले जि. अहील्यानगर यास चोरी केलेल्या चांदीचे पादूकांसह पकडून पोलीस स्टेशनला हजर केले आहे. सदर आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार सुदाम घोडे हे करीत आहेत.सदरची कामगिरी संदिप गिल्ल, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अमोल मांडवे उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग खेड, पुणे ग्रामीण, श्रीकांत कंकाळ, पोलीस निरीक्षक मंचर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पोलीस हवालदार शरद कूलवडे, पोलीस हवालदार सुदाम घोडे, पोलीस हवालदार शरद कुलवडे, पोलीस अंमलदार योगेश रोडे, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार हनूमंत ढोबळे, पोलीस अंमलदार सुनिल काठे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!