बीडच्या आंधळेवाडीतील ६ जणांकडून विघ्नहर कारखान्याची ६० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल
1 min read
जुन्नर दि.१०:- ऊसतोडणी मजूर आणि वाहतूक सेवा पुरवतो असे कबूल करून ६० लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची
केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुलै २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडली असून, या प्रकरणी कारखान्याचे मुकादम अशोक सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामराव आंधळे, बिपिन आंधळे, भागवत आंधळे, भीमराव आंधळे, शहादेव आंधळे आणि दीपक सानप (सर्व रा. आंधळेवाडी, बीड) या सहा आरोपींनी संगनमताने कारखान्याशी करारनामा केला.
मजूर व वाहतूक पुरवण्याची हमी देत त्यांनी कारखान्याकडून ६० लाख रुपयांहून अधिक रक्कम बँक खात्यात घेतली. परंतु, त्यांनी दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यांनी या रकमेचा अपहार करून कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ऋषिकेश टिटमे करत आहेत.