ॲल्युमिनियम तार चोरणाऱ्या अट्टल चोरांस आळेफाटा पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

1 min read

आळेफाटा दि.९:- मुख्यमंत्री सौर कृषी योजना अंतर्गत चालू असलेल्या कामाचे ॲल्युमिनियम धातुची तार चोरी करणारी अट्टल चोरांस आळेफाटा पोलिसांनी केले जेरबंद.

याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर रामकृष्ण बनकर (रा. रेणुका नगर, नागपूर जि. अहिल्यानगर) हे इलेक्ट्रिक ठेकेदार असून त्यांचे मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत बोरी बुद्रुक (ता.जुन्नर)

या ठिकाणी चालू असल्याने त्यांनी या कामाचे इलेक्ट्रिक मटेरियल (आसी कंडक्टर डॉग १०० तारेचे ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे बंडल) बोरी बुद्रुक गावच्या हद्दीत असलेले आनंद आश्रम या ठिकाणी ठेवले होते ते दि. २७ ऑगस्ट २५ रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेता आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी पथकाला गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाला तांत्रिक माहितीच्या आधारे व गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा सौरभ ओंकार तांगडे व त्याच्या साथीदारांनी त्यांच्या जवळील अल्टो कार व

टाटा कंपनीचा छोटा हत्ती या वाहनांचा वापर करून सदर गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. अनुसार शोध पथकाने नारायणगाव परिसरात जाऊन सौरव ओंकार तांगडे या ताब्यात घेऊन त्याने गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार एमएच ४६ एन ६१८६ व टाटा कंपनीची छोटा हत्ती एम एच १२ इ.क्यु ७२१७ अस ताब्यात घेतले असता त्यांनी विकास देवराम कुऱ्हाडे (रा.सुलतानपुर ता.जुन्नर)

याच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच त्यांच्या समवेत असलेले इतर आरोपींचा तपास शोध सुरू आहे. सदर आरोपीकडून गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेल्या दोन वाहने तसेच ॲल्युमिनियम तारेचे बंडल असा एकूण १२ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तपास कामी जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्था. गु. शा .पुणे ग्रामीणचे अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेला सूचनाप्रमाणे पो.हवा.विनोद गायकवाड, पंकज पारखे,

अमित माळुंजे, संदीप माळवदे, नवीन आरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप सखाराम जंबड, प्रशांत तांगडकर यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!