खो-खो स्पर्धेत समर्थचे चार संघ उपविजेते

1 min read

बेल्हे दि.९:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडा परिषद,पुणे जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व जयहिंद इंटरनॅशनल स्कूल कुरन आयोजित तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. यामध्ये समर्थ गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज बेल्हे, विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले व भरघोस यश संपादन केल्याची माहिती समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर व गुरुकुलचे प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी दिली. जुन्नर तालुक्यातील विविध शाळा या शालेय खो-खो स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या होत्या.यशस्वी संघांची माहिती पुढीलप्रमाणे : समर्थ गुरुकुल- १४ वर्षाखालील मुले – द्वितीय क्रमांक १७, वर्षाखालील मुले-तृतीय क्रमांक, १७ वर्षाखालील मुली -द्वितीय क्रमांक
समर्थ ज्युनिअर कॉलेज- १९ वर्षा खालील मुले- द्वितीय क्रमांक, १९ वर्षाखालील मुली- द्वितीय क्रमांक यशस्वी विद्यार्थ्यांनाक्रीडा संचालक एच. पी. नरसुडे,सुरेश काकडे,विनायक वऱ्हाडी,राहुल अहिरे यांनी मार्गदर्शन केले. समर्थ स्पोर्ट अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल,बास्केटबॉल,क्रिकेट,नेट बॉल, ॲथलेटिक्स, बुद्धिबळ इत्यादी खेळांचा समावेश आहे. खो-खो हा खेळ बुद्धिमत्ता शारीरिक क्षमता दर्शवणारा खेळ आहे. समर्थ गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजचे खेळाडू तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावरती यश मिळवत आहेत. तसेच जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यां जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी पात्र ठरत आहेत. त्यासाठी क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन,खेळाडूंचा सराव व कौशल्य मोलाचे ठरत असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्राचार्या वैशाली आहेर, प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!