विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर डी. फार्मसी महाविद्यालयास “अतिउत्तम” श्रेणी प्रदान

1 min read

बोटा दि.९:- संगमनेर तालुक्यातील बोटा येथील विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर डी. फार्मसी विभागास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी “अतिउत्तम” श्रेणी प्रदान करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या देखरेख समितीने महाविद्यालयास दि.१ एप्रिल २०२५ रोजी भेट दिली व त्या अंतर्गत महाविद्यालयाचे बाह्य परीक्षण करण्यात आले. यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यामधील अध्ययन, अध्यापन, अत्याधुनिक प्रयोगशाळा व त्यातील उपकरणे, नवीन उपक्रम, प्रशासकीय बाबी, विद्यार्थ्यांशी संवादप्रगतीसाठी ही संस्था स्तरावरील शैक्षणिक कामकाजाची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यशाळा गुणवंत विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या विविध कंपनीमध्ये झालेली निवड विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच असणारे टेक्निकल स्किल्स या सर्व बाबींचे समितीने कौतुक केले. प्राचार्य डॉ. किरण शिंदे यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांनी माहिती समितीस सादर केली. त्यानुसार दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर या महाविद्यालयास अतिउत्तम श्रेणी प्राप्त झाली.या यशाबद्दल संस्थेचे सेक्रेटरी रामदास पोखरकर,सीईओ डॉ.विदुलता पाटील, कॅम्पस डायरेक्टर दिपक रहाणे, प्राचार्य डॉ. किरण शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.या यशामध्ये महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. राजश्री देशमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचा मोलाचा सहभाग लाभला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!