तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे अव्वल स्थान कायम
1 min read
लाखणगाव दि.१०:- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, आंबेगाव तालुका क्रीडा शिक्षक संघटना व रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबेगाव तालुकास्तरीय शालेय शासकीय कबड्डी स्पर्धा 2025-26 चे आयोजन अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एन. सी. आर. डी. शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव व महात्मा गांधी विद्यालय मंचर यांच्यामध्ये 14 वर्षाखालील मुलींच्या संघात अंतिम सामना रंगला, या सामन्यात अटीतटीच्या लढतीत
लाखनगाव शाळेने विजय मिळवत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आपला सहभाग निश्चित केला आहे. गेली सलग चार वर्षांपासून विद्यालयाचा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक येत आहे. आणि ती परंपरा यंदाही कायम राखण्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्या आहेत.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मुख्याध्यापक अनिल देसले, क्रीडा शिक्षक प्रविण शिकारे व सहकार्य कल्पना राजगुरू, छाया वाघुंडे, रसिका शिंदे, यांचे लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या विषयाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमरजीत खराडे वरिष्ठ मुख्याध्यापक सुनिल वळसे, आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया
संघाचे अध्यक्ष व माजी सरपंच सतीशराव रोडे पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक मनोज रोडे पाटील, सरपंच प्राजक्ता रोडे पाटील, उपसरपंच दीपाली वाघमारे व सर्व सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालक,
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ गाडगे,व इतर समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.