साईलक्ष्मीच्या सभासदांना १५ टक्के लाभांश

1 min read

वडगाव कांदळी दि.८:- साईलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वडगाव कांदळी (ता.जुन्नर) या पतसंस्थेची ७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन प्रा.श्रीकांत पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली.साईलक्ष्मी पतसंस्थेचे १ हजार ५१९ सभासद असून संस्थेच्या १० कोटी ३१ लाख रुपयांच्या ठेवी असून ४ कोटी ४९ लाख गुंतवणूक केली आहे. संस्थेचा स्वनिधी १ कोटी ५० लाख रुपये आहे. संस्थेने कोणतेही बँकेचे कर्ज घेतलेले नाही संस्था स्थापनेपासून संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ ‘ मिळालेला आहे. संस्था स्थापनेपासून सभासदांना दिवाळी भेटवस्तू देत आहे. सभासदांना १५ टक्के लाभांश व दिवाळी भेटवस्तू देणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन प्रा. श्रीकांत पाचपुते यांनी दिली. संस्थेमार्फत सभासदांना एक लाख रुपयांचा विमा उतरविला आहे. सभासदांना एसएमएस सुविधा, आरटीजीएस, एनईएफटी, क्यूआर कोड सुविधा,मोबाईल बँकिंग, गृहतारण कर्ज या सुविधा पुरविल्या जात आहेत. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संचालक सतीश पाचपुते यांनी केले अहवाल वाचन सचिव पोपट बढे यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन रामदास पवार यांनी मानले. यावेळी व्हाईस चेअरमन रामदास पवार, सचिव पोपट बढे,खजिनदार मंगेश घाडगे, संचालक सतीश पाचपुते, अतुल खेडकर,नीलकंठ भोर, अण्णा पाचपुते, जावेद इनामदार,(vic चेअरमन), नारायण पाचपुते, विनायक लांडगे,नवनाथ थोरात, ज्ञानेश्वर लांडगे, माऊली अडागळे, करीम इनामदार, लता भोर, पूजा मुटके,उत्तम लांडगे, सुनील निलख मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र भोर ,पूजा भोर, स्नेहल बढे, दैनंदिन ठेव प्रतिनिधी किरण ढोबळे, नितीन पाचपुते यांच्यासह माजी पोलीस उपायुक्त प्रकाशजी लांडगे, जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके,उपाध्यक्ष गुलाब नेहरकर,ऑडिटर डी बी औटी, संस्थापक दत्तू भोर, मार्गदर्शक बबन घाडगे, बाजार समितीचे संचालक नबाजी घाडगे ,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे,शिरूर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वैभव काळे, वडगाव कांदळी गावच्या सरपंच उल्का पाचपुते उपसरपंच संजय खेडकर, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ पाचपुते, सुवर्णा मुटके,संगीता भोर, पोलीस पाटील बाळासाहेब पाचपुते, कांदळीचे उपसरपंच विशाल रेपाळे, माजी उपसरपंच अनिल बापू भोर ,वडगावचे माजी उपसरपंच शरद पाचपुते, बिरोबा दूध संस्थेचे चेअरमन संदेश पाचपुते ,नगदवाडी सोसायटीचे चेअरमन सुरेश बढे ,उद्योजक रामदास निलख, आर डी पाचपुते, शंकर पाचपुते,गुलाब घाडगे, सत्यवान थोरात, गोरक्ष मुटके, महेंद्र सोनवणे,राहुल भोर, राजेश भोर,प्रवीण लांडगे, खुशाल लांडगे, देविदास भोर, संभाजी पवार ,बाजीराव मुटके, पिराजी भोर, विश्वास बढे, शामराव बढे ,रघुनाथ बढे, श्रीधर बढे,ज्ञानेश्वर बढे ,संदीप बढे,प्रवीण गुंजाळ ,शोभा पाचपुते, विमल पाचपुते विनायक लांडगे,दत्तू पवार, भास्कर भोर, गुलाब भोर, सुखदेव भोर, शशिकांत बढे, सुनील पटाडे, संदीप निलख,सुनील कुतळ, संतोष भोर,भाऊ पाचपुते, रंगनाथ पाचपुते ,मंगेश बढे, सुरेश गुंजाळ यांच्यासह सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोपट भोर ,सत्यवान थोरात, रंगनाथ पाचपुते, संजय खेडकर, प्रकाशजी लांडगे, अमित बेनके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्था कार्यक्षेत्र वाढवण्याची तसेच भागभांडवल वाढवण्यासाठी भागाची रक्कम वाढवण्यासाठी मंजुरी देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!