ज्ञानयात्रेची नवी सुरुवात; समर्थ ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेशोत्सव
1 min read
बेल्हे दि.८:- समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे, विद्यालयात प्रथम वर्षात नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर यांनी प्रास्ताविका मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण नव्हे तर चारित्र्य,संस्कार आणि सामाजिक बांधिलकी याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने शैक्षणिक प्रवास करावा असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले की अकरावी हा तुमच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. अकरावी म्हणजे फक्त वर्ग नाही तर पुढील करिअर कडे नेणारी पायरी आहे. अभ्यासाची सवय, वेळेचे व्यवस्थापन, करिअर नियोजन, व्यक्तिमत्व विकास, मेहनत, शिस्त आणि ध्येयाने तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनात यशस्वी व्हाल.
” मोठी स्वप्ने पहा त्यासाठी ध्येय ठेवा आणि सातत्याने प्रयत्न करा यश तुमच्या पावलांशी नक्कीच येईल.”
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. अनिल गुंजाळ (मा.सहाय्यक आयुक्त शिक्षणाधिकारी पुणे) उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार ठेवावेत. अपयशाने खचून न जाता आपल्या आरोग्यरूपी संपत्तीचे जतन करावे. विद्यार्थ्यांनी जिद्द,मेहनत, चिकाटीने नियमित अभ्यास करावा.मार्क महत्वाचे नाहीत जगणे कळाले पाहिजे.आयुष्यात जे क्षेत्र निवडाल ते आवडीचे निवडा किंवा जे क्षेत्र निवडले आहे त्या मधे आवड निर्माण करा.आयुष्यात संधी अनेक आहेतआणि त्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम समर्थ संकुल करत असते.
परीक्षेला सामोरे जाताना या विषयावरही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, समर्थ कॅम्पुटर सायन्सचे प्राचार्य डॉ.शेलार सर,
डॉ.घोलप प्रा. कंधारे सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. संतोष पोटे, प्रा. राजेंद्र नवले, प्रा. विनोद चौधरी, प्रा. अमोल खामकर, यांनी विशेष प्रयत्न केले सूत्रसंचालन प्रा. संगीता रिठे यांनी केले तर क्रीडा संचालक एच.पी. नरसुडे सर यांनी सर्वांचे आभार मानले.