बेल्हे परिसरात लाडक्या बाप्पाला निरोप
1 min read
बेल्हे दि ८:- बेल्हा (ता.जुन्नर) येथे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर,गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला या असा जयघोष करीत बेल्हा (ता.जुन्नर) येथील गणपती मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाला मंगलमय वातावरणात निरोप दिला.येथे प्रत्यक्ष मिरवणुकीत चारच मंडळांनी सहभाग घेतला होता. प्रत्यक्ष मिरवणुकीला दुपारी तीन नंतरच सुरूवात झाली. या मध्ये प्रथमता मोरया प्रतिप्ठानच्या गणपतीची आरती माजी सरपंच गोट्याभाऊ वाघ व मंडळाचे कार्यकर्ते यांच्या हस्ते झाली.त्यानंतर प्रत्यक्ष मिरवणुकीत सुरूवात झाली.मंडळाचे कार्यकर्ते डी.जे.च्या तालावर नाचत होते.या मिरवणुकीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.
पावडरचा व गुलालाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला.या गणपतीचे विसर्जन साडेचार वाजण्याच्या सुमारास झाले. त्या नंतर राजे उमाजी नाईक मित्र मंडळाचा गणपती मिरवणुकीत सहभागी झाली.या गणपतीची आरती ग्रामपंचायत सदस्य नवनाथ शिरतर, स्वप्नील भंडारी व सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते झाली.
त्यानंतर हा गणपती मिरवणुकीत सहभागी झाला होता. पारंपरिक वाद्याच्या तालावर मंडळाचे कार्यकर्ते नाचत होते. या मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता.या नंतर सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपती मिरवणुकीत सहभागी झाला. माजी पंचायत समिती सदस्य जयवंत घोडके यांच्या हस्ते आरती झाली.
त्यानंतर प्रत्यक्ष मिरवणुकीला सुरुवात झाली.या गणपती बरोबरच रोहीदास मित्र मंडळाचा ही गणपती होता.या मिरवणुकीत अशोक घोडके,विजय घोडके,बापु सेलोत, अरूण सोनवणे, पोपट संभेराव विश्वनाथ डावखर गणेश बांगर व गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.या गणपतीचे विसर्जन रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाले.
त्या नंतर रात्री साडेसात वाजता श्रीराम गणेश मित्र मंडळाच्या गणपतीची आरती शिवराम कुलकर्णी व सागर शिरतर,किरण मंडाले आदींच्या हस्ते झाली त्या नंतर प्रत्यक्ष मिरवणुकीला सुरूवात झाली. डी.जे. तालावर या मंडळाचे कार्यकर्ते नाचत होते.
या मंडळाच्या गणपतीचे विसर्जन रात्रौ दहा वाजण्याच्या सुमारास झाले.घरगुती गणपतींचे विसर्जन अगदी शांततेत पार पडले.मिरवणुका अगदी शांततेत पार पडल्या.पोलीस शिपाई विकास गोसावी व त्यांच्या सहका-यांनी चोख केले होते.