शिवगणेश मित्र मंडळाची फुगड्या, विठू नामाचा जय गोश, टाळ मृदंगाच्या तालावर विसर्जन मिरवणूक संपन्न

1 min read

बेल्हे दि.८:- जुन्नर तालुक्यातील मंगरूळ – झापवाडी येथील शिवगणेश मित्र मंडळ गणेशोत्सव सोहळा मोठया भक्ती भावाने संपन्न झाला. या वेळी फुगड्या तसेच विठू नामाचा जय गोशामध्ये टाळ मृदंगाच्या तालावर गणरायाची विसर्जन मिरवणूक पार पडली.या मिरवणुकीत लहान मुले, मुली, तरुण व महिलांचा ही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. सर्व तरुण एकाच रंगाचा कुर्ता परिधान करून मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. विठू माऊलीचा जयघोष, टाळ मृदूंच्या तालावर ती सर्वांनी पावल्या खेळून या बाप्पाला निरोप दिला. मंडळाचे यंदाचे ३१ वे वर्षे असून दरवर्षी मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला जातो. गेले दहा दिवस अनेक कार्यक्रम असतात. यंदा मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. भव्य होम मिनिस्टर तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रोज टाळ मृदंग व पावल्या खेळत बाप्पाची आरती केली जाते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!