लालबागच्या राजाचे ३५ तासांनंतर अरबी समुद्रात विसर्जन
1 min read
मुंबई दि.८:- मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं अखेर ३५ तासांनी विसर्जन करण्यात आलं आहे. गिरगावच्या खोल समुद्रात या राजाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी भाविक आणि मंडळाचे कार्यकर्ते अत्यंत भावूक झाले होते.काल सकाळी आठ वाजता लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे बाप्पाला अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यास अडथळा येत होता.त्यातच समुद्राला भरती आल्याने पाण्याची पातळीही वाढली होती. मात्र, अथक प्रयत्नांनंतर अखेर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं आहे.लालबागचा राजा काल सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता.
त्यापूर्वीच अरबी समुद्राला भरती आल्यानं विसर्जनात अडथळा निर्माण झाला होता. भरती आणि ओहोटीची परिस्थिती निर्माण झाल्यानं विसर्जनाला साडे बारा ते तेरा तासांचा वेळ लागला. समुद्राला ओहोटी आल्यानंतर लालबागच्या राजाचा गणपती नव्या अत्याधुनिक तराफ्यावर साडे चार वाजता ठेवण्यात यश आलं होतं.
लालबागच्या राजाच्या गणपतीच्या विसर्जनापूर्वीच्या उत्तर आरतीला उद्योजक अनंत अंबानी उपस्थित होते.अरबी समुद्रात विसर्जनासाठी लालबागच्या राजाच्या गणपतीची मूर्ती घेऊन तराफा साडे आठच्या दरम्यान निघाला . या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. दरवर्षी लालबागच्या राजाचं सकाळी साडे आठच्या दरम्यान विसर्जन होतं.
मात्र, अरबी समुद्राला भरती आल्यानं गणपतीची मूर्ती नव्या तराफ्यावर ठेवण्यात अडचणी निर्माण झाल्या. ओहोटी सुरु झाल्यानंतर नव्या तराफ्यावर गणपतीची मूर्ती साडे चार वाजता ठेवण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा दागिने आणि आभूषणं लालबागच्या राजाला घालण्यात आली. विसर्जनापूर्वीची उत्तर आरती अनंत अंबानी यांच्या उपस्थितीत पार पाडली.