गणपती विसर्जन करताना पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू
1 min read
Oplus_16908288
निमगाव सावा दि.७:- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील अशोक खंडू गाडगे (वय २६) याचा शनिवार दि.६ रोजी दुपारी ३ वाजता कुकडी नदीच्या पात्रात गणेश विसर्जन करताना दगडावरून पाय घासल्याने तोल जाऊन वेगात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात पडुन अपघात झाला होता. त्यावेळी उपस्थित तरुणांनी वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले त्यात त्यांना अपयश आले.
येडगाव धरणातून पावसामुळे नदीमध्ये विसर्ग सुरु होता म्हणून पाण्याला वेग असल्याने तो सापडला नाही. नारायणगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी पाहोचल्यावर आपदा पथकाचे स्वयंसेवक यांना पाचारण केले. परिसरातील मच्छीमार व स्थानिक अनेक तरुणांनी शोध मोहिमेत सुरू केली.
परंतु अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवून रविवार दि.७ सप्टेंबर सकाळी बोरी गावातील तरुणांनी शोध मोहिमेत सहभाग घेवुन शोध घेतला असता सकाळी ११ वाजता अशोक गाडगे चा मृतदेह नदीत १५ ते २० फूट खोलवर आढळून आला. त्यानंतर मृतदेह नारायणगाव येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. अशी खबर अशोक गाडगे यांचे चुलतभाऊ योगेश गाडगे (वय ३५) रा. निमगाव सावा यांनी नारायणगाव पोलिसांत दिली आहे.
पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष कोकणे करत आहेत. या युवकाच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.