निमगाव सावात गणपती विसर्जनासाठी गेलेला तरुण पाण्यात बुडाला; शोध सुरू
1 min read
निमगाव सावा दि.६:- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील गणपती विसर्जन करीत असताना साडेतीन पावणे चारच्या सुमारास अशोक खंडू गाडगे (वय 23) हा दुर्दैवाने पाण्यात बुडाला आहे. मंडळाचा गणपती विसर्जन करण्यासाठी कुकडी नदीत चार जण पाण्यात गेले होते. त्यापैकी तीन जण बाहेर आले परंतु एक जण बेपत्ता झाला असून गेल्या एक दीड तासापासून शोध सुरू आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.