जिल्हा परिषद च्या उत्कृष्ट शाळा व शिक्षक पुरस्कारांची यादी जाहीर; जुन्नर तालुक्यातील ‘इतक्या’ शिक्षकांची निवड

1 min read

पुणे दि.६:- चांगले काम करणाऱ्या उत्कृष्ट शिक्षकांचा आणि उत्कृष्ट शाळांना जिल्हा परिषदेकडून गौरव केला जाणार आहे. त्यानुसार २७ शिक्षकांची पुरस्कारासाठी तर ९ शाळांची शाळा अध्यक्ष पुरस्कारसाठी निवड करण्यात आली आहे.पुणे जिल्हा परिषदेकडून उत्कृष्ट शिक्षक, केंद्रप्रमुख तसेच अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षक यांना गौरविण्यात येते. जिल्हास्तरावरून निवड झालेल्या शाळांना अध्यक्ष चषक प्रदान केला जातो, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली आहे.निकषानुसार व गुणांकनानुसार १३ तालुक्यांतील ५२ शिक्षक, २ केंद्रप्रमुख व २० शाळांची तपासणी या पुरस्कारांसाठी करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून प्रथम व उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी दोन शिक्षकांची अशाप्रकारे १३ तालुक्यांतील २७शिक्षकांची तसेच एक केंद्रप्रमुख व नऊ शाळांची अध्यक्ष चषक पुरस्कारासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली होती. या समितीमार्फत सन २०२५-२०२६ या वर्षात विविध पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेली आहे.पुणे जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शाळा चषक पुरस्कारांची यादी पुढीलप्रमाणे: इयत्ता पहिली, चौथी व पाचवीसाठी १) जि. प. प्राथमिक शाळा आर्वी, ता. जुन्नर, २) जि. प. प्राथमिक शाळा भांडगाव, ता. दौंड, ३) जि. प. प्राथमिक शाळा, पाचर्णेवाडी, ता. शिरूर, ४) जि. प. प्राथमिक शाळा गौराईमळा, ता. इंदापूर, ५) जि. प. प्राथमिक शाळा, गुळाणी, ता. खेड.इयत्ता पहिली ते आठवी उच्च माध्यमिक शाळांची यादी पुढीलप्रमाणे १) जि. प. प्राथमिक शाळा, वसेवाडी, ता. शिरूर, २) जि. प. प्राथमिक शाळा, नाणेकरवाडी, ता. खेड, ३) जि. प.प्राथमिक शाळा, मांजरवाडी, ता. जुन्नर, ४) जि. प. प्राथमिक शाळा, रुळे, ता. वेल्हे.जि. प.च्या उत्कृष्ट शिक्षकांची यादी विजय सोपानराव वळसे, गोरडेमळा, ता. आंबेगाव, २) संगीता बबन वळसे,मोरडेवाडी, ता. आंबेगाव, ३) वनिता सचिन जाधव, काटेवाडी, ता. बारामती, ४) शांता संदीप बालगुडे, सांगवी, ता. बारामती, ५) गणेश अशोक बोरसे, म्हाळवाडी, ता. भोर, ६) अश्विनी संजय पवार, उत्रोली, ता. भोर, ७) धनश्री माणिक पासलकर शेलारमेमाणवाडी, ता. दौंड, ८) रेखा राजू वाखारे, वडगाव बांडे, ता. दौंड, ९) कुरेशी सल्लाउद्दीन शेख, लोणी, ता. हवेली, १०) मीना अशोक म्हसे, जगतापवाडी, ता. हवेली, ११) प्रेमिला संभाजी खाडे, मंडलिकवस्ती, ता. इंदापूर, १२) शेख ताहेस बकस दत्तवाडी, ता. इंदापूर, १३) वैभव बबनराव सदाकाळ, येणेरे, ता. जुन्नर, १४) मधुकर ज्ञानदेव गायकवाड, उंब्रज नं. १, ता. जुन्नर, १५) शैला मुकुंद गावडे, धानोरे, ता. खेड, १६) वर्षाराणी दत्तात्रय खळेकर, दावडमळा, ता. खेड,
१७) पोपटराव रामचंद्र चौगुले, धामणे ता. मावळ, १८) अक्षता सचिन अंबुळे, कान्हे, ता. मावळ, १९) रियाज नसीर शेख, भूगाव क्र. २, ता. मुळशी, २०) सलीम हसन तांबोळी, मुठा, ता. मुळशी, २१) मनोजकुमार भालचंद्र सटाल, नारायणपूर, ता. पुरंदर, २२) सचिन मनोहर बोरावके, पिसरेवाडी, ता. पुरंदर, २३) मोहन गोविंद जगताप, चांबळी, ता. पुरंदर, २४) गोरख भाऊसाहेब काळे, वावळेवाडी, ता. शिरूर, २५) संतोष पांडुरंग वेताळ, कोयाळी, ता. शिरूर, २६) शबाना जावेद खान, पानशेत, ता. वेल्हा, २७) शुभांगी दुर्योधन भोसले, निगडे बु., ता. वेल्हा. तर, गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्कार हा निर्मला दिलीप काळे (ता. मावळ) यांना जाहीर करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!