मराठा आरक्षणाच्या ‘जीआर’वर कर्जुले हर्याच्या भूमिपुत्राची सही
1 min read
पारनेर दि.६:- कर्जुले हर्या येथील सुदाम एकनाथ आंधळे हे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागात उपसचिव पदावर कार्यरत आहेत.मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी मराठा -आरक्षणाबाबत अध्यादेश (जीआर) जारी केला. या अध्यादेशावर कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील भूमिपुत्राची सही आहे. शासनाचे उपसचिव सुदाम आंधळे यांच्या स्वाक्षरीने मराठा आरक्षणाचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.सकल मराठा समाजाने या अध्यादेशाचे स्वागत केले. पारनेरकर म्हणून उपसचिव सुदाम आंधळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या व घरची परिस्थिती अतिशय गरिबीची. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण श्री हरेश्वर विद्यालय, कर्जुले हर्या येथे झाले. पुढे बीएस्सी अॅग्री झाल्यानंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन कक्ष अधिकारी पदावर मंत्रालय, मुंबई विविध विभागांत सेवा केली.
प्रगल्भ बुद्धिमत्ता,जिद्द,चिकाटीच्या जोरावर आता मंत्रालयात उपसचिव पदावर पदोन्नती मिळवली.मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पाच दिवस उपोषण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार शासनाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत मसुदा तयार करीत हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला.