नारळाच्या दरात झपाट्याने वाढ
1 min read
जुन्नर दि.३:- नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी लहान नारळ १५ ते २० रुपये तर मध्यम आकाराचे नारळ ३५ ते ४० रुपये दराने उपलब्ध होते. मात्र, सध्या लहान नारळ ३० ते ३५ रुपये तर मोठ्या नारळांना तब्बल ५० ते ५५ रुपये या दर मिळत आहे. म्हणजेच अल्पावधीतच नारळाच्या भावात जवळजवळ दुप्पट वाढ झाली आहे.या भाववाढीमागे अनेक कारणे आहेत. कर्नाटक व तामिळनाडू या राज्यांमधील उत्पादनात घट झाल्याने महाराष्ट्रात पुरवठा कमी झाला आहे. वाहतूक खर्च, मजुरी दर आणि मध्यस्थांचे नफे यामुळेही दर वाढले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात नारळाची पूजा, प्रसाद, तुळशीचे व्रत,
नैवेद्य अशा सर्वच धार्मिक कार्यक्रमांमध्ये अनिवार्य गरज भासते. त्यामुळे मागणी झपाट्याने वाढल्याने विक्रेत्यांनी भाव वाढवले आहेत. गणेशोत्सव साजरा होत असल्याने पुणे, दररोज हजारो नारळांची खप होत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या अधिसूच नारळांचा तुटवडा जाणवत आहे.